‘मी समाजवादी आहे. मात्र, समाजवाद ही परिपूर्ण वा निर्दोष रचना आहे, असं मानत नाही. मात्र, ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायानं मी समाजवादी आहे…’
मी समाजवादी आहे, असं विवेकानंद म्हणालेत हे खरं; पण आम्ही समाजवादी आहोत, असं म्हणून समाजवादी होता आलं असतं, तर स्वतंत्र पक्ष सोडून भारतातले इतर सगळे पक्ष कमी-अधिक वेळ समाजवादी होते, असं म्हणावं लागेल! पण ही सांगून होणारी गोष्ट नाही. ती व्यवहारात दिसावी लागते. मार्क्स सांगतो, समाजवादाला, कोणत्याही परिवर्तनाला धर्मचिकित्सेपासून सुरुवात होते आणि धर्मचिकित्सा करणं हे असिधाराव्रत आहे. ती अग्निपरीक्षा आहे.......